शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात १०३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत होता; परंतु ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत होता; परंतु ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा आजार संपर्कातून होत नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले असले तरी केवळ गाफील राहिल्याने आतापर्यंत रुग्णसंख्या शतकपार गेली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १०३ एवढी झाली असून, १६ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असून, दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणेकडे ईएनटी, नेत्र व दंततज्ज्ञांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात १३ मे रोजी ‘म्युकरमायकोसिस’चा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातील १०२ रुग्णांना कोरोनाचा इतिहास असल्याचे समोर आले आहे. तसेच आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील तब्बल ४१ जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ ४५ ते ६० वयोगटांतील ३५, १८ ते ४५ मधील २६ आणि १८ वर्षांखाली केवळ एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच ६६ पुरुष रुग्ण असून, ३७ महिलांचा समावेश आहे. हा आजार वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औषधींचा पुरेसा साठा कधी मिळणार? गंभीर प्रश्न

या आजारावरील औषधी पुरेसे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून मागणी केली आहे.

अगोदरच औषधी महागडी आहेत, त्यातही तुटवडा असल्याने नातेवाइकांसमोर पेच निर्माण झाला.

औषधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यानेही रुग्णांचा मृत्यू हाेत असल्याचा आरोप सामान्यांमधून केला जात आहे.

म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे

डोळ्यांभोवती वेदना होणे, डोळे लाल होणे, ताप येणे, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या होणे, मानसिक स्थिती बदलणे, गाल दुखणे/सुजणे, डोळे दुखणे, सुजणे, दृष्टी अधू होणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे, नाक दुखणे व ते सतत वाहू लागणे, दात हलू लागणे, अशी लक्षणे आहेत.

ही घ्या काळजी

जे ऑक्सिजनवर होते आणि नुकतेच कोरोनामुक्त झालेले आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासावे. मास्क नियमित व स्वच्छ वापरावा. वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच आपण तरुण आहोत, आपल्याला काही होत नाही, हा गैरसमज मनातून काढावा.

डॉक्टर म्हणतात

डायबेटीज असेल तर जास्त काळजी घ्यावी. कोरोनाचा रुग्ण असेल आणि जेवताना दात दुखत असेल, भूवयाच्यावर दुखत असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.

-डॉ. विशाल कोटेचा फिजिशियन

म्युकरमायकोसिस हा आजार संपर्कातून होत नाही. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वांना कोरोनाचा इतिहास आहे. त्यामुळे कोरोना झालेल्यांनी जास्त काळजी घ्यावी. थोडेही लक्षणे जाणवायला सुरुवात झाली की तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल ऑफिसर

या आजारासंदर्भात आपल्याकडे योग्य नियोजन केले जात आहे. सरकारी डॉक्टर नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलावले जात आहे. सध्या तरी स्वतंत्र वॉर्ड तयार केलेला आहे. परंतु, सर्व उपचार अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात केले जात आहेत.

-डॉ. सूर्यकांत गित्ते, सीएस, बीड