शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:45 IST

बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत.

बीड : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे. परळीचे मुंडे, गेवराईच्या पंडित घराण्यातच आतापर्यंत सार्वाधिक आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये मंत्रिपदे आलेली आहेत. त्या पाठोपाठ बीडचे क्षीरसागर आणि माजलगावचे सोळंके कुटुंबही मागे नाही. यांनीही आमदारकीसह मंत्रिपद मिळविलेले आहे. बीड, माजलगाव, परळीतून नवख्यांना फार संधी मिळालेली नाही, हेही वास्तव आहे.

१९६२ नंतर ८९ आमदार झाले आहेत. यामध्ये १० महिलांना संधी देण्यात आली होती. इतर सर्व पुरुष आमदार राहिलेले आहेत. त्या पाठोपाठ कोणाच्या घरात किती आमदार राहिले, याची माहिती घेतली असता, सर्वात अव्वल क्रमांकावर परळीचे मुंडे कुटुंब आहे. त्यांनी परळी आणि रेणापूर अशा दोन मतदारसंघांतून आठ वेळा गुलाल उधळला आहे, तसेच गेवराईच्या पंडितांनीही सात वेळा गुलाल उधळत दुसरा क्रमांक पटकावला आहे. गेवराईमध्ये काही वेळा पवार कुटुंबाने पंडितांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु परळीत मुंडे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार मागील अनेक निवडणुकांमध्ये विजयी झालेला नाही. यंदा या मतदारसंघातून महायुतीकडून धनंजय मुंडे यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार शोधला जात आहे. अद्याप तरी नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे याकडेही लक्ष लागले आहे.

मुंदडा सलग पाच वेळा आमदारकेज मतदार संघातून विमल मुंदडा या सलग पाच वेळा आमदार झालेल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्रीपदही सांभाळले होते. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांची सून नमिता मुंदडा आमदार झाल्या आणि दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

चार वेळा आमदार, दोन वेळा खासदारगोपीनाथ मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या टर्मला पंडितराव दौंड आमदार झाले. त्यानंतर मात्र, सलग चार वेळा मुंडे आमदार राहिले. २००९ साली परळी मतदारसंघातून त्यांनी मुलगी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यांनीही सलग दोन विजय मिळविले, परंतु २०१९ साली पंकजा यांचा पराभव झाला, तर धनंजय मुंडे विजयी झाले. २००९ सालीच गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभा विजयी झाले. २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे प्रीतम मुंडे खासदार झाल्या. २०१९ मध्येही डॉ.मुंडेच खासदार होत्या. २०२४ ला पंकजा यांना उमेदवारी दिली, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.

पंडितांच्या घरातच जास्त काळ आमदारकीशिवाजीराव पंडित दोन वेळा आमदार राहिले त्यानंतर पुतण्या बदामराव पंडित यांनी त्यांच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. बदामराव तीन वेळा आमदार राहिले. मधल्या काळात शिवाजीराव पंडित यांची चिरंजीव अमरसिंह पंडित एक वेळा आमदार राहिले.  शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांना काहीकाळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली.

आमदार, मंत्री झाले, पण विकासाचे काय?जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. बीडमध्ये अद्यापही रेल्वे आली नाही, पाण्यासाठी मोठा प्रकल्प नाही. काही भागांत आजही दुष्काळी परिस्थिती आहे. रस्ते, वीज, पाणी आदी समस्या आजही कायम असल्याचे दिसते.

कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?गेवराईपवार कुटुंब - ४पंडित कुटुंब - ७--माजलगावसोळंके कुटुंब - ५--बीडक्षीरसागर कुटुंब - ३---चौसाळाक्षीरसागर कुटुंब - ३--आष्टीधस कुटुंब - ३धोंडे कुटुंब - ४--केजमुंदडा कुटुंब - ६सोळंके कुटुंब - १---परळीमुंडे कुटुंब - ३---रेणापूरमुंडे कुटुंब - ५

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीgeorai-acगेवराईmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवbeed-acबीड