शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मदत केंद्राबाहेर मुकादम, नातेवाइकांमध्ये हाणामाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

बीड : जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रात कोरोना अहवाल घेण्यासाठी आलेल्या लोकांना तासन‌्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका ...

बीड : जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रात कोरोना अहवाल घेण्यासाठी आलेल्या लोकांना तासन‌्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर रविवारी दुपारी मुकादम आणि नातेवाइकांमध्ये चक्क हाणामारी झाली. पोलिसांनाही पाचारण केले होते. नोडल ऑफिसरच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद नव्हती.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधित रुग्ण लवकर शोधून कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रातून रितसर अहवाल घेऊनच दुकाने उघडावेत, अन्यथा दुकाने सील करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे चाचणी केलेले अहवाल घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होत आहे. सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षामुळे लोक व्यवस्थित रांगा लावत नाहीत. याच रांगा लावण्यावरून येथील मुकादम गव्हाणे व एका दांपत्याचे वाद झाले. एकमेकांवर धावून जात धक्काबुक्कीही करण्यात आली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नोडल ऑफिसर डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनी धाव घेतली. सर्वांना रांगेत उभा करून पोलिसांनाही पाचारण केले. त्यानंतर मुकादम व नातेवाइकांची समजूत काढत हा वाद मिटविला. तसेच सामान्यांना लवकर अहवालाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सर्वांना सूचनाही केल्या. डॉ.ढाकणे यांनी नियोजन केल्यानंतर दुपारनंतर परिस्थिती सुरळीत झाल्याचे दिसले.

या सुधारणा करणे आवश्यक

मदत केंद्रात मनुष्यबळ वाढवावे

पॉझिटिव्ह लोकांना रांगेत उभा राहू न देता नातेवाइकांना सांगावे, अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी

गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा

कर्मचाऱ्यांचा संवाद चांगला ठेवून संतापलेल्या लोकांची समन्वयाने समजूत काढावी

रांग तोडून ओळखीने अहवाल घेण्यास बंदी घालावी

मदत केंद्र वगळता इतर कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप टाळावा

===Photopath===

210321\212_bed_17_21032021_14.jpeg~210321\212_bed_16_21032021_14.jpeg

===Caption===

रूग्णालयात धाव घेत डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनी हा वाद मिटविला. नातेवाईकांची समजूत काढताना छायाचित्र.~जिल्हा रूग्णालयात मुकादम व नातेवाईकांमधील वादाचे चित्र.