अडीच महिन्यांच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:21 IST2019-05-29T00:20:17+5:302019-05-29T00:21:12+5:30

कीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे.

Mother absconding for two and half month's 'uninitiated' on the road | अडीच महिन्यांच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार

अडीच महिन्यांच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार

ठळक मुद्देगेवराईतील घटना : चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड : एकीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे. एका अडीच महिन्याच्या जिवंत मुलीला रस्त्यावर सोडून देत माता फरार झाली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंंगीजवळील टोलनाका परिसरात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पाडळसिंगीजवळील टोलनाका परिसरात एका बाळाचा रडण्याचा आवाज याच भागात राहणाºया नागरिकांच्या कानी पडला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना एक मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसले. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. ते अवघ्या पाच मिनिटांत पोहोचले आणि चिमुकलीला घेऊन पहाटे ५ वाजता जिल्हा रुग्णालयात आले. येथील डॉ.मोहिनी जाधव व त्यांच्या टीमने या चिमुकलीवर तात्काळ उपचार केले. सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. गेवराई पोलीस ठाण्यात पो. ना. दत्ता चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
‘त्या’ प्रकरणाचा तपास अपूर्णच
बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले होते. या बाळावर उपचार करून नंतर शिशुगृहात पाठविण्यात आले होते. हे बाळ कोणी टाकले, याचा तपास मात्र, अद्यापही बीड ग्रामीण पोलिसांना लागलेला नाही.
डॉक्टर, ग्रामस्थांकडून मायेची उब
चिमुकली सापडताच ग्रामस्थांनी तिला जवळ घेऊन दूध पाजले. जिल्हा रुग्णालयात आल्यावर डॉ.मोहिनी जाधव-लांडगे, परिचारिका मोहोर डाके, मीरा नवले यांनी तिला आंघोळ घालून उपचार केले.
तसेच मायेची ऊबही दिली. बाळाचे वजन साडे तीन किलो असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ.जाधव यांनी सांगितले. फरताडे अमोल, गणेश काळे, सोनू देवडे आयआरबीच्या या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.

Web Title: Mother absconding for two and half month's 'uninitiated' on the road