पाचवीतील विद्यार्थिनीचा तासाभरात दोनदा विवाह; बीडमधील खळबळजनक प्रकार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:25 IST2025-06-13T15:25:40+5:302025-06-13T15:25:40+5:30

बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोनदा विवाह लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Minor girl studying in class 5 got married twice in a single day in Beed | पाचवीतील विद्यार्थिनीचा तासाभरात दोनदा विवाह; बीडमधील खळबळजनक प्रकार समोर

पाचवीतील विद्यार्थिनीचा तासाभरात दोनदा विवाह; बीडमधील खळबळजनक प्रकार समोर

Beed Crime: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच बीड शहरातील शाहू नगर भागातून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सोमवारी शाळेत जाण्याची तयारी करणाऱ्या पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरातच दोन वेळा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. तक्रारीची कुणकुण लागताच पहिला नवरदेव पळून गेला, तर दुसरा नवरीला घेऊन जात असताना पकडला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सोनिया (नाव बदलले) ही अवघ्या ११ वर्षाची आहे. नुकतीच ती पाचवी पास झाली असून, सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती. तिला वडील आणि सावत्र आई आहे. परंतु, त्यांनी सोनियाचा अगोदरच दोन लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेल्या सोहेल (नाव बदलले) याच्यासोबत लग्न जुळवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले. मात्र, त्याच्या पत्नीने तक्रार केली. याची कुणकुण सोहेल याला लागली. त्याने तिथून पळ काढला.

यानंतर सोहेलने आपल्या बहिणीच्या गावच्या शौकत या (नाव बदलले) मुलाला तेथे पाठवले. त्यानंतर त्याच्यासोबत विवाह केल्याचे दाखवले. फोटोही काढले. या प्रकरणात कोणाला संशय येऊ नये, म्हणून शौकत नवरीला घेऊन जात होता. याची माहिती पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही ताब्यात घेतले.

दरम्यान,  गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यामध्ये ३०० हून अधिक बालविवाह झाल्याचे समोर आलं आहे. २५८ बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या प्रकरणी एकूण १८ जणांवर गुन्हा नोंदवण्यता आला आहे.
 

Web Title: Minor girl studying in class 5 got married twice in a single day in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.