शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चावडीवरील बैठका झाल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

लसीकरण करून घ्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी दोन दिवस लसीचा ...

लसीकरण करून घ्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी दोन दिवस लसीचा स्टॉक कमी झाल्याने लसीकरण मोहीम मंदावली होती. मात्र, आता पुन्हा लस साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ४५ वर्षे वयाच्या पुढील महिला व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.

लोखंडीच्या कोविड रुग्णालयात रेंजअभावी गैरसोय

अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. या परिसरात मोबाइलला रेंज उपलब्ध होत नाही. कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी सातत्याने फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेंज उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे नातेवाइकांना संपर्क साधणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. रुग्णही रेंज उपलब्ध व्हावी म्हणून आपला बेड सोडून खिडक्या गाठून रेंज उपलब्ध होते का? यासाठी धडपडत असतात. रुग्णांना दिलासा देण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी या परिसरात रेंज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केली आहे.

नातेवाइकांची धावपळ

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नातेवाइकांचीही धावपळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट आणणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाइकांना तपासणीसाठी नेणे, अशा विविध कामांसाठी अंबाजोगाई तालुक्यात सध्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.

लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत घ्यावा

अंबाजोगाई : लाँड्री व्यवसाय हा दैनंदिन जीवनात गरजेचा व्यवसाय बनलेला आहे. कपडे धुणे, त्यांना इस्त्री करणे हे काम स्वच्छतेचे आहे. यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा, लाँड्री व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. हे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व सेवाभाव जोपासण्यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल जाधव यांनी केली आहे.