CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 20:05 IST2024-12-30T20:03:27+5:302024-12-30T20:05:51+5:30

आरोपींना आता लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आमच्यासह सर्वच जनतेची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले.

meeting wirh CID officials what are the demands regarding CDR and Valmik Karad Dhananjay Deshmukh reaction | CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणातील तीन आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बीडपोलिसांकडून या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या तपासाची स्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर  देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, "मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्याकडून आम्हाला उद्या या प्रकरणाच्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे मी आज वाल्मिक कराड किंवा अन्य कोणाविषयी बोलणार नाही. मात्र माझ्या भावाच्या हत्येच्या कटात जे कोणी सहभागी आहेत त्या प्रत्येकाला शिक्षा झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, हेच मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हेच सांगत राहणार," असं देशमुख यांनी ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, "सीडीआरमध्ये कोणाची नावं आहेत, ते पोलीस उद्या आम्हाला सांगतील, त्यानंतरच मी तुम्हाला माहिती देईन. आम्ही तपासाबाबत मुख्यमंत्री साहेब आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवला आहे. मात्र आरोपींना आता लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आमच्यासह सर्वच जनतेची मागणी आहे," असंही धनंजय देशमुख म्हणाले.

Web Title: meeting wirh CID officials what are the demands regarding CDR and Valmik Karad Dhananjay Deshmukh reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.