मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस, तरी आरोपी सापडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:31 IST2024-12-31T06:30:51+5:302024-12-31T06:31:06+5:30

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. 

Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; 9 CID teams, over 150 police, but the accused could not be found | मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस, तरी आरोपी सापडेनात

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस, तरी आरोपी सापडेनात

बीड/पुणे : मस्साजोग गावच्या सरपंचांची हत्या तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी याप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड पुण्यात रविवारी रात्री उशिरा शरण आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, कराड याचा शोध घेण्यात येत असून, तो शरण आलेला नाही, अथवा अद्याप त्याला अटकदेखील करण्यात आली नसल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली. तसेच पुण्यात कराड याच्यावर हे गुन्हे दाखल नसल्याने पुण्याचा तसा संबंध येत नसल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. 

फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचे पत्र
- सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट आहे. 
- त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत आहेत. परंतु आरोपी सापडत नसल्याने विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक झाले आहेत. 
- त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. 
- त्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी महसूल व उपनिबंधक कार्यालयाला पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय म्हणाले धनंजय देशमुख?
तपासाचा आढावा घेण्यासाठी सीआयडीची भेट घेतली. जास्तवेळ बोलणे झाले नाही. परंतु मंगळवारी आणखी सविस्तर बोलणार आहोत. तसेच दोन दिवसांत आरोपी अटक करू, असा विश्वास सीआयडीने दिले आहे. सीडीआरबाबतही विचारले; परंतु उद्या बोलतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

माहिती घेतली...
मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासाची माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुरवणी जबाब, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या चर्चांवर आपण मंगळवारी बोलणार असल्याचेही देशमुख यांनी माध्यमांना सांगितले.

...तरीही शस्त्र परवाना अन् दोन पोलिस बॉडीगार्ड
वाल्मीक कराडवर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.

अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीची खात्री केली. परंतु तीन मृतदेह सापडल्याची माहिती खोटी असल्याचे चौकशीतून समोर आले. सीआयडीकडून तपासाच्या अनुषंगाने जी माहिती विचारतील, 
ती देत आहोत.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड
 

Web Title: Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; 9 CID teams, over 150 police, but the accused could not be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.