लग्न ठरले, सुपारीच्या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:00 IST2025-03-27T19:00:05+5:302025-03-27T19:00:55+5:30

विद्युत प्रवाह उतरल्याने युवकाचा मृत्यू! आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील घटना

Marriage was fixed, a young man died of electric shock just hours before the Supari ceremony | लग्न ठरले, सुपारीच्या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

लग्न ठरले, सुपारीच्या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

- नितीन कांबळे
कडा (बीड) : 
सकाळी आठच्या दरम्यान कपड्याला इस्त्री करत असताना अचानक विजेचा धक्का बसून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे घडली. ओंकार मच्छिंद्र शेकडे असे मृत युवकाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील ओंकार शेकडे या तरुणाचे लग्न ठरले होते. आज दुपारी सुपारीचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात विवाहाची तारीख काढायची होती. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ओंकार कपड्यांना इस्त्री करत होता. अचानक इस्त्रीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने धक्काबसून ओंकारचा जागीच मृत्यू झाला. 

एकुलता एक मुलगा गेल्याने शोक अनावर
तीन मुलीच्या पाठीवर ओंकार झाला होता. घरातील एकुलता एक मुलगा मृत झाल्याने शेकडे कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल, तीन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Marriage was fixed, a young man died of electric shock just hours before the Supari ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.