जीपचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:14+5:302021-07-23T04:21:14+5:30

केज : जीपचे हप्ते फेडण्यासाठी चार लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विविहितेच्या तक्रारीवरून ...

Marital harassment for paying jeep installments | जीपचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

जीपचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

केज : जीपचे हप्ते फेडण्यासाठी चार लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विविहितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात पतीसह इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विभागात नोकरीत असलेल्या रमा धिवार यांचे चार वर्षांपूर्वी काळेगाव (घाट) ता. केज येथील शरद धिवार यांच्यासोबत लग्न झालेले आहे. लग्न झाल्यापासून रमा हिला एक महिन्यापर्यंत सासरी चांगले नांदवले. नंतर पती शरद धिवार व त्याच्या नातेवाईकांनी बँकेकडून कर्जावर घेतलेल्या जीपचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेऊन येण्यासाठी आग्रह धरला तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशी फिर्याद पीडितेने केज पोलीस ठाण्यात २२ जुलै रोजी दिली. त्यानुसार शरद धिवार व सासू, सासरे, दिर, जाऊ, नणंद व नंदावा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Marital harassment for paying jeep installments