Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी माजलगावात मोर्चा; तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:58 IST2018-08-09T19:57:22+5:302018-08-09T19:58:09+5:30
मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला माजलगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला.

Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी माजलगावात मोर्चा; तालुक्यात कडकडीत बंद
माजलगाव (बीड ) : मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला माजलगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी शहरातून मोर्चा काढून परभणी फाटा येथे रास्तारोको केले.
आज सकाळी १० वाजता शहरातील संभाजी चौक ते परभणी फाटापर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढाला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी फाटा मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. शहरासह तालुक्यातील तालखेड, टाकरवन, गंगामसला, धर्मेवाडी , टालेवाडी, नितरुड, किट्टीआडगाव, पवारवाडी, दिंद्रुड आदी ठिकाणी रास्तारोको, ठिय्या आंदोलने करण्यात आले.