Marashatra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:06 IST2018-08-09T20:05:23+5:302018-08-09T20:06:09+5:30
मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला केज शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Marashatra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यात कडकडीत बंद
केज (बीड ) : मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला केज शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शहरात रॅली काढली. तसेच तालुक्यातील आडस येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तर कुंबेफळ येथे आंदोलकांनी रस्त्यावर जेवण बनवत तेथेच पंगत बसवली. तर चंदनसावरगाव येथे आंदोलकांनी मुंडण शासनाचा निषेध करतात. तालुक्यातील लहुरी , युसूफवडगाव , धनेगाव ,वीडा , आनंदगाव, आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.