भाविकाची चेन लंपास करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST2021-08-26T04:35:33+5:302021-08-26T04:35:33+5:30

बाबासाहेब रामा बिक्कड (रा. नाव्होली, ता. केज) हे सोमवारनिमित्त २३ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी उत्तरेश्वर पिंप्री येथे मंदिरात गेले होते. ...

Man arrested for chaining lamp of devotee | भाविकाची चेन लंपास करणाऱ्यास अटक

भाविकाची चेन लंपास करणाऱ्यास अटक

बाबासाहेब रामा बिक्कड (रा. नाव्होली, ता. केज) हे सोमवारनिमित्त २३ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी उत्तरेश्वर पिंप्री येथे मंदिरात गेले होते. तेथे गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने बिक्कड यांच्या गळ्यातील ७३ हजार किमतीची सोन्याची चेन लंपास केली. याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, बिक्कड यांनी सांगितलेल्या वर्णनावरून गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष अशोक जाधव (३०,रा. गांधीनगर, बीड) यास जेरबंद केले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्यास केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पो. ना. अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड यांनी ही कारवाई केली.

Web Title: Man arrested for chaining lamp of devotee