खेळता खेळता होत्याचं नव्हतं झालं; माजलगावमध्ये झोका खेळताना ९ वर्षांच्या वृंदाचा दुर्दैवी अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:27 IST2026-03-31T16:27:08+5:302026-03-31T16:27:20+5:30

घरच्या घरी खेळताना होणाऱ्या अशा लहान अपघातांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

majalgaon-9-year-old-girl-died-accidental-strangulation-swing-tragedy | खेळता खेळता होत्याचं नव्हतं झालं; माजलगावमध्ये झोका खेळताना ९ वर्षांच्या वृंदाचा दुर्दैवी अंत!

खेळता खेळता होत्याचं नव्हतं झालं; माजलगावमध्ये झोका खेळताना ९ वर्षांच्या वृंदाचा दुर्दैवी अंत!

माजलगाव (जि. बीड): घरात झोका खेळण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकलीचा झोक्याचा फास बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात मंगळवारी घडली. वृंदा समीर रुद्रवार असे मृत चिमुकलीचे नाव असून, या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वृंदा ही येथील ईगलवुड शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. सुट्टीच्या दिवशी घडलेल्या या अपघाताने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

खेळाचे रुपांतर मृत्यूच्या फासात
शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची नात वृंदा (वय ९) आपल्या लहान बहिणीसह घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या झुल्यावर खेळण्यासाठी गेली होती. तेथे एका खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना अचानक खुर्ची खाली कलंडली आणि झोक्याची दोरी वृंदाच्या गळ्याला अडकली. यामध्ये तिचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

आईने पाहिले आणि हंबरडा फोडला
बऱ्याच वेळानंतरही वृंदा जेवण्यासाठी खाली येत नसल्याने तिची आई तिला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. तेव्हा तिला वृंदा लटकलेल्या अवस्थेत दिसली. आईने फोडलेला हंबरडा ऐकून वडील, आजी आणि आजोबांनी तातडीने धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चुणचुणीत आणि गोंडस असलेल्या वृंदाच्या जाण्याने शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांनाही मोठा धक्का बसला आहे.

पालकांसाठी धोक्याची घंटा
घरच्या घरी खेळताना होणाऱ्या अशा लहान अपघातांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. मुलांनी झोका खेळताना किंवा उंचावर खेळताना मोठ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वृंदाच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच नातेवाईक आणि नागरिकांनी रुद्रवार यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.

Web Title : मजलगाँव में त्रासदी: झूला झूलते समय 9 वर्षीय बच्ची की मौत

Web Summary : मजलगाँव में एक 9 वर्षीय बच्ची की घर पर झूला झूलते समय दुखद मौत हो गई। वृंदा रुद्रवार, जो दूसरी कक्षा में पढ़ती थी, को उसकी माँ ने झूले से लटका हुआ पाया। अस्पताल ले जाने के बावजूद, उसे मृत घोषित कर दिया गया, जिससे परिवार और समुदाय सदमे में है।

Web Title : Tragedy in Majalgaon: 9-Year-Old Dies in Swing Accident

Web Summary : A 9-year-old girl in Majalgaon died tragically after a swing accident at home. Vrinda Rudrawar, a second-grader, was found by her mother hanging from the swing. Despite being rushed to the hospital, she was declared dead, leaving the family and community devastated.