शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हमीपेक्षा कमी भाव !

By admin | Updated: December 29, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचे केवळ गणित बिघडवले नाही तर जगण्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. जिथे पिकेच धड आली नाही, तेथे गुणवत्ता येणार कशी? हा साधा प्रश्न आहे;

संजय तिपाले , बीडनिसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचे केवळ गणित बिघडवले नाही तर जगण्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. जिथे पिकेच धड आली नाही, तेथे गुणवत्ता येणार कशी? हा साधा प्रश्न आहे; परंतु केंद्र सरकारच्या कापूस महामंडळाने हा सवाल उपस्थित करत हमीभावापेक्षा शंभर रुपये क्विंटलमागे कमी देण्याचा फतवाच काढला आहे. या फतव्याने ‘दुष्काळात तेरावा’ अशी स्थिती निर्माण झाली असून दरकपातीची ‘मेख’ शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणणारी आहे.कापूस उत्पादनात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या बीडमध्ये यावर्षी लागवडक्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढले होते. सुमारे ४ लाख २० हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापूस आहे. मात्र, सुरुवातीपासून रुसलेला पाऊस शेवटपर्यंत फिरकलाच नाही. अल्पशा पावसाने कापसाची वाढ खुंटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला़ गतवर्षी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईची निर्मिती झाली होती़ यंदा उत्पादन निम्म्यापेक्षा अधिक घटल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. दुष्काळाशी लढा देत बोंड- बोंड आलेला कापूस शेतकऱ्यांनी वेचून घरात आणला. कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची निराशाच झाली. कापसाला गतवर्षी ४ हजार इतका भाव होता. यावर्षी त्यात केवळ ५० रुपयांची वाढ झाली. (सीसीआय) कापूस महामंडळाने जाहीर केलेल्या ४ हजार ५० इतक्या हमीभावाने कापूस खरेदीही सुरु झाली ; परंतु कापसाची गुणवत्ता तपासण्यासाठी ११ तालुक्यांतून कापसाचे नमूने गोळा करुन तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.त्याचा अहवाल आल्यानंतर कापसाच्या धाग्याची लांबी २७ इंच तर तलमतेची प्रतवारी ३ पेक्षा कमी आढळली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ निमशासकीय खरेदी केंद्रांना कापूस महामंडळाने नोटिसा पाठवून गुणवत्ता कमी आढळली तर हमीपेक्षा कमी भावाने देयके अदा करावित, असा फतवा काढला.क्विंटलमागे ४ हजार ५० ऐवजी आता ३ हजार ९५० इतकेच रुपये टेकविले जातात. त्यामुळे दुष्काळ व दरकपात अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत़प्रतवारीची अट शिथील कराजिल्ह्यात वर्षभरात १२५ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही़ दुष्काळी स्थितीबरोबरच कापसाला हमी भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे़ प्रतवारीसाठी अडवणूक करण्याऐवजी ही अट शिथील करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे़ शेतकऱ्यांना अडवणुकीऐवजी सावरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले़एका हेक्टरमध्ये सरासरी २७५ किलो रुईचे उत्पादन मिळते़ जिल्ह्यात गतवर्षी सरासरी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईचे उत्पादन झाले होते़ यंदा सीसीआयने आतापर्यंत केवळ १ लाख ९२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापसाचा झाडा होऊ लागल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.४पुरेसा पाऊस न पडल्याने कापसाच्या झाडांची पूर्ण वाढ झाली नाही. शिवाय पावसाअभावी झाडेही जागेवरच वाळून गेली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत धाग्याची लांबी व तलमता कमी होणे अपेक्षितच होते, असे जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कापूस महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एच़ डी़ दळवी म्हणाले, दुष्काळ आहे परंतु आम्हाला नियम डावलता येत नाहीत़ ४ हजार ५० इतका भाव देताना २९ स्टेपल लेंथ व ३़६ इतकी प्रतवारी आवश्यक आहे़ जिल्ह्यात कुठेच ही प्रतवारी नाही़ त्यामुळे क्विंटलमागे १०० रूपये दरकपात करावी लागली आहे़