तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 04:51 PM2020-10-05T16:51:53+5:302020-10-05T16:52:36+5:30

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी  झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजलगाव येथील शेतकऱ्यांना धीर दिला.

Kumbhakarni sleep of three-legged government - Pravin Darekar | तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर

तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर

Next

माजलगाव : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजलगाव येथील शेतकऱ्यांना धीर दिला.

ओला दुष्काळ जाहीर करुन बागायतीसाठी ५० हजार तर कोरडवाहु शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली. बीड जिल्हयात आल्यानंतर दरेकर यांनी गंगामसला, घळाटवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. भाजपाचे सरकार असतांना राज्यातील अतिवृष्टी असो की कोल्हापुर जिल्हयात निर्माण झालेली पुरपरिस्थिती, त्यावेळी तात्काळ आमच्या सरकारने मदत दिली होती. आता मराठवाडयात फळबागा उध्वस्त झाल्या आहेत कोरडवाहु जमीनीतील पिके उध्वस्त झालेली आहेत शेतकरी उघडयावर पडलेला असतांना शासन मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे त्यातच विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या अटी लादून कातडी बचाओ  धोरण अवलंबू लागल्या आहेत. 

शेतकऱ्यांना मदत, अनुदान व विमा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.  यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राउत, ज्ञानेश्वर मेंडके, डाॅ. अशोक तिडके, डाॅ. भगवान सरवदे, मनोज फरके, श्रीकृष्ण सोळंके, बाळासाहेब सोळंके, ईश्वर खुर्पे, ज्ञानेश्वर सरवदे, परशुराम सोळंके, अविनाश गोंडे आदींसह भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Kumbhakarni sleep of three-legged government - Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.