केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:01 IST2018-10-02T20:01:04+5:302018-10-02T20:01:53+5:30

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व अन्य विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आदोलन करण्यात आले. 

Kaij Talukas declare drought; Nationalist Congress agitation | केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

केज (बीड ) : केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व अन्य विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आदोलन करण्यात आले. 

महात्मा गांधी जयंती निमित्त नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी तोंडाला काळी पट्टी लावून "गांधीगिरी" पद्धतीने आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले.आंदोलनात महादेव सूर्यवंशी, राहुल गदळे, ज्ञानेश्वर चवरे, अतुल इंगळे, धनसंपत ठोंबरे, लिंबराज फरके, काका जाधव, वीरेंद्र जोगदंड, शुभम बिक्कड, नरहरी काकडे आदी कार्यकर्ते सहभागी होते. 

Web Title: Kaij Talukas declare drought; Nationalist Congress agitation