विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची केजमध्ये धुलाई करून अर्धनग्न धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 11:46 IST2019-01-29T11:42:40+5:302019-01-29T11:46:37+5:30

परीक्षा असल्याची थाप मारून एका विद्यार्थिनीला खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासेसवर बोलावून घेतले.

In Kaij parents attacks on teacher who molest minor girl student | विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची केजमध्ये धुलाई करून अर्धनग्न धिंड

विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची केजमध्ये धुलाई करून अर्धनग्न धिंड

ठळक मुद्देशिक्षकी पेशाला काळीमा बीड जिल्ह्यात खळबळ

केज (जि. बीड) : परीक्षा असल्याची थाप मारून एका विद्यार्थिनीला खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासेसवर बोलावून घेतले. एका विद्यार्थ्याने व शिक्षकाने मुलीची छेड काढली. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर संतापलेल्या पालकाने सदर शिक्षकाच्या अंगावरील कपडे काढून मनसोक्त धुलाई करून क्लासेसपासून पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न धिंड काढली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार केज शहरात सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिक्षकासह त्या विद्यार्थ्याविरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केज शहरातील कानडी रस्त्यावर फिनिक्स नावाचा खाजगी क्लासेस सुरू आहे. क्लासेस चालवत असलेल्या सिद्धेश्वर रामराव माने नामक खाजगी शिक्षकाने सोमवारी सकाळी एका विद्यार्थिनीस फोन करून परीक्षा असल्याचे सांगितले. विद्यार्थिनी तेथे आल्यानंतर त्याचवेळी शिकवणी वर्गात खाजगी शिक्षकासह हजर असलेल्या विद्यार्थ्याने सदरील विद्यार्थीनीची छेड काढली. घरी गेल्यानंतर झालेला प्रकार विद्यार्थिनीने पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मानेला मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिक्षकासह विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
संतापलेल्या पालकाने तत्काळ शिक्षकास शोधून काढत त्यास यथेच्छ चोप देत त्याची शहरातील कानडी रस्त्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न धिंड काढत पोलीसांच्या स्वाधीन केले.  मुलीच्या वडिलांच्या तक्र ारीवरु न विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी क्लासेचा चालक शिक्षक सिध्देश्वर मानेसह ऋ षिकेश पाळवदे या विद्यार्थ्याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली. 

Web Title: In Kaij parents attacks on teacher who molest minor girl student