जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:18 IST2019-05-19T00:17:44+5:302019-05-19T00:18:08+5:30

बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले.

Jeep-biking; Two friends killed on the spot | जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार

जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार

बीड : बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळील बायपासवर शुक्रवारी मध्यरात्री घडला.
धनंजय शिवाजी कोल्हे (२८, रा.चांदेगाव ता.बीड) आणि सतीश सारंगधर मोरे (२९, रा.चांदणी, ता.बीड) अशी मयतांची नावे आहेत. धनंजय व सतीश हे दोघे जिवलग मित्र होते. शुक्रवारी रात्री उशिरा ते दुचाकीवरून (एमएच २३ आर. ६४०) चौसाळ्याकडे जात होते. याच दरम्यान समोरुन येणाºया जीपने (क्र.एम.एच.२३ ए.डी.४४६२) चौसाळा बाह्यवळण रस्त्यालगत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चौसाळा चौकीतील पोलीस कर्मचारी अशोक मेसे यांच्यासह चव्हाण, गर्जे, शेंडगे, डोंगरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.
दरम्यान दोन्ही मृतदेह चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणी उशिरापर्यंत नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Jeep-biking; Two friends killed on the spot