'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 06:27 PM2021-09-18T18:27:57+5:302021-09-18T18:31:44+5:30

गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले.

'It's over, I'm quitting'; Female doctor's application goes viral on social media | 'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल

'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल

Next

- सोमनाथ खताळ
बीड : खूप दिवसांपासून मी एकटीच काम करतेय. तरीही कोणीही येतेय आणि मलाच बोलतेय. त्यामुळे आता बस्स झालं. मला खुप त्रास होतोय, म्हणून मी नौकरी सोडतेय, असा हस्तलिखीत अर्ज महिला डॉक्टरने मॅग्मो संघटनेच्या सोशल मिडीयावरील ग्रुपवर टाकला आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामस्थांबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकाराने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जातेगाव आरोग्य केंद्रात डॉ.प्रकाश फड व डॉ. पल्लवी झोपडे हे दोन वैद्यकीय कार्यरत आहेत. ८ मार्च पासून डॉ.फड हे आजारी रजेवर आहेत. त्यामुळे डॉ.झोडपे या एकट्याच कार्यरत आहेत. नुकतीच डॉ.फड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी डॉ.जाधव आले. परंतू त्या आगोदर डॉ.झोडपे यांनी यंत्रणा सांभाळली. कोरोना लसीकरण, ओपीडी आदी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्या लागल्या. अशातही गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले. महिला वैद्यकीय अधिकारी असतानाही त्यांना सहकार्य करण्याऐवजी तक्रारी केल्या. शनिवारी तर चक्क एका शिक्षकाने 'तुम्हीच इंजेक्शन द्या' असा हट्ट धरला. याच मुद्यावरून बाचाबाची झाली आणि डॉ.झोडपे व शिक्षक आणि त्यांच्या भावात वाद झाले. यावर संतापलेल्या डॉ.झोडपे यांनी अर्ज लिहित सोशल मिडीयावर अर्ज टाकत मी नोकरी सोडतेय असे कळविले. या प्रकाराने मात्र, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा - क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

ग्रामस्थांकडून सातत्याने त्रास 
मी दोन वर्षांपाूसन जातेगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मला लहान बाळ आहे. ते बाळ तुम्ही सोबतच का आणता, या मुद्यावरून अनेकदा वाद घातले. तसेच शनिवारीही एका शिक्षकाने तुम्हीच इंजेक्शन द्या असा हट्ट धरला. परिस्थितीवरून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भावाला बोलावून घेत आणखी वाद घातले. येथील ग्रामस्थांकडून सारखाच त्रास होत असल्याने मी नोकरी सोडत आहे. मी वरिष्ठांकडे आणखी राजिनामा दिला नाही पण संघटनेच्या ग्रुपवर अर्ज टाकला आहे.
- डॉ.पल्लवी झोडपे, वैद्यकीय अधिकारी जातेगाव ता.गेवराई

हेही वाचा - धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

Web Title: 'It's over, I'm quitting'; Female doctor's application goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app