क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 03:54 PM2021-09-18T15:54:07+5:302021-09-18T15:58:11+5:30

Emerging hockey player Chandan Thakur death News : नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे ताे वर आलाच नाही.

Major damage to the sports sector; Emerging hockey player Chandan Thakur drowned in Kayadhu river basin | क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देनांदापूर येथील मामाच्या गावी आला हाेतानदी पात्रात उडी मारल्यानंतर तो वर आलाच नाही

नांदापूर ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील मामाच्या घरी आलेल्या अकाेला येथील २२ वर्षीय उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर राेजी घडली आहे. चंदन दिलीप ठाकुर असे मृत खेळाडूचे नाव आहे. ( Emerging hockey player Chandan Thakur drowned in Kayadhu river basin ) 

अकाेला येथील उदयाेन्मुख हाॅकीपटु  हा १५ सप्टेंबर राेजी नांदापूर येथील मामा रगदिरसिंग ठाकुर यांच्या घरी आजीसाेबत आला हाेता. आल्यापासून ताे कयाधु नदी पात्रात पाेहण्यासाठी आजीला म्हणत हाेता. यानंतर १७ सप्टेंबर राेजी दुपारच्या सुमारास आजीला साेबत घेत, कयाधु नदीपात्रात पाेहण्यासाठी गेला हाेता. बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कयाधु नदी पात्रात पाेहण्यासाठी उडी मारली. नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे ताे वर आलाच नाही. नदी काठावर बसलेली आजी त्यांची वाट पाहत राहली. तो कोठेच दिसेनासा झाल्याने, आजीने घरी जाऊन त्यांच्या मामाला सांगितले.

हेही वाचा - लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मामा व ग्रामस्थांच्या मदतीने कयाधु नदीपात्रात चंदनचा शाेध घेण्यास सुरूवात केली. मात्र ताे सापडला नाही. तेथुन २ किलाेमीटर अंतरावर असलेल्या कयाधु नदीपात्रातील सोडेगाव पुलाजवळ त्यांचा मृतदेह ५ वाजण्याच्या सुमारास सापडला. मृतदेह पाण्याबाहेर काढुन ही माहिती आई -वडिलांना देण्यात आली. यानंतर चंदनचा मृतदेह शुक्रवारी रात्री अकाेल्याकडे नेण्यात आला. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पाेलीस ठाण्यात नाेंद घेण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या घटनेमुळे हॉकी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Major damage to the sports sector; Emerging hockey player Chandan Thakur drowned in Kayadhu river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.