धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 01:03 PM2021-09-18T13:03:14+5:302021-09-18T13:05:20+5:30

Accident in Dharur Ghat : घाटातील रस्ता अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे

The tanker crashed into a ravine in Dharur Ghat, killing the driver on the spot | धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

Next

धारूर ( बीड ) : धारूर घाटातील दरीत सोलापूरहून निघालेला सिंमेट कॉंक्रीटचा टँकर ( क्र. एमएच 12 एनएक्स 4090 ) आज सकाळी कोसळला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. या घाट रस्ता अरुंद असल्याने वांरवांर होणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर धारूर-तेलगाव रस्ता रस्ता चकाचक झाला आहे. माञ, घाटातील रस्ता अरूंदच राहिला आहे. यामुळे घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी पहाटे सोलापूरकडून सिंमेट भरून परभणीकडे जाणारा टँकर सकाळी साडेनऊच्या दरम्यान घाटातील अवघड वळणावर कठडा तोडून दिडशे ते दोनशे मिटर खोल दरीत कोसळला. यात चालक पैंगबर पटेल गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी चालकाला तपासून मृत घोषित केले.

Web Title: The tanker crashed into a ravine in Dharur Ghat, killing the driver on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app