शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयपाठोपाठ चऱ्हाटा आरोग्य केंद्रातही १०० ऑक्सिजन खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन खाटा कमी पडत असल्याने आता बीडपासून जवळच असलेल्या चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० ...

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन खाटा कमी पडत असल्याने आता बीडपासून जवळच असलेल्या चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. याच्या कामाला उद्या, सोमवारी सुरुवात होणार असून, आठवडाभरात या सर्व खाटा रुग्णांसाठी सज्ज होणार आहेत. आयटीआयप्रमाणेच येथील सर्व नियोजन ग्रामीण आरोग्य विभाग सांभाळणार आहे.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. असे असले तरी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. भविष्यात काही अडचणी येऊ नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी चऱ्हाटा येथे नव्यानेच तयार झालेले प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. नवी इमारत आणि शहरापासून जवळच असल्याने येथे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. येथे तब्बल १०० ऑक्सिजन खाटांचे नियोजन असणार आहे. येथे सर्व डॉक्टर, कर्मचारी हे ग्रामीण आरोग्य विभागातील असणार आहेत. तसेच काही कोविडसाठी विशेष भरती केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सीईओ, डीएचओंचे नियोजन यशस्वी

जिल्हा रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत असल्याने अजित कुंभार यांनी बाजूच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये २२० खाटांची व्यवस्था केली. तसेच परिसरातील इमारतींमध्येही ऑक्सिजन बेड तयार केले. ३२० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात तब्बल ७२० खाटा तयार करण्यात आल्या. या खाटाही अपुऱ्या पडल्याने आयटीआयमधील सीसीसी बंद करून येथे आणखी २०० ऑक्सिजन खाटा तयार केल्या. आता चऱ्हाटा आरोग्य केंद्रात १०० खाटा तयार केल्या जात आहेत. कुंभार व डीएचओ डॉ. पवार यांच्या नियोजनातून या संकल्पना यशस्वी होत आहेत.

२५ आरोग्यकेंद्रांत पाच ऑक्सिजन खाटा

कोरोनाबाधितांसह संशयितांची प्रकृती चिंताजनक झाल्यास त्याला तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन मिळणार आहे. यासाठी २५ पीएचसीमध्ये पाच ऑक्सिजन खाटांचे नियोजन केले आहे. येथे रुग्णाला स्थिर करून नंतर पुढे पाठविले जाणार आहे. सर्व जबाबदारी ही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असेल.

चऱ्हाटा आरोग्य केंद्राची इमारत नवी असून येथे १०० ऑक्सिजन खाटा तयार केल्या जात आहेत. सोमवारी कामाला सुरुवात होऊन आठवडाभरात ते पूर्ण होईल. तसेच २५ पीएचसीमध्येही ५ ऑक्सिजन खाटा तयार केल्या जात आहेत. आठवडाभरात याला सुरुवात होईल. डीएचओंनी यादी केली आहे.

- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड