डुब्बाथडी ते वाघोरा रस्ता डांबरीकरण पुलाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:03+5:302021-07-07T04:42:03+5:30

डांबरी रोड चालू असलेल्या पावसाळ्यात वाहून जात आहे. डांबरी रोड वाहून गेल्यास ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील नागरिकांना दळवळणासाठी व रहदारीसाठी ...

Inquire the quality of the asphalting bridge from Dubbathadi to Waghora | डुब्बाथडी ते वाघोरा रस्ता डांबरीकरण पुलाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करा

डुब्बाथडी ते वाघोरा रस्ता डांबरीकरण पुलाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करा

डांबरी रोड चालू असलेल्या पावसाळ्यात वाहून जात आहे. डांबरी रोड वाहून गेल्यास ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील नागरिकांना दळवळणासाठी व रहदारीसाठी अडचण निर्माण होईल.

डांबरी रस्त्याप्रमाणेच पुलाचे काम देखील अत्यंत दर्जाहीन झालेले असून अत्यंत दुय्यम दर्जाचे सिमेंट, वाळू व ठिसूळ दगडांचा पूल बांधणीसाठी वापर केलेला आहे.

पुलाच्या मजबुतीसाठी व तडे जाऊ नयेत, यासाठी आवश्यक असलेली लेव्हलिंग योग्यप्रकारे केलेली नसल्याने पूल ढासळून रहदाऱ्यांच्या जीवितास धोका होण्याची संभाव्य शक्यता आहे. पुलाला आताच तडे पडलेले आहेत. ते झाकण्यासाठी मुरुम, माती वापरली आहे.

ही दोन्ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असून शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली नाहीत.

मुख्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांनी दोन्ही कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी व कामाची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करावी, तपासणी अहवालात दर्जाहीन काम आढळून आल्यास दोन्ही कामांची बिले अदा करू नयेत, अन्यथा कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, अशा स्वरूपाचे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता, बीड यांना राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हा सरचिटणीस राहुल तौर व काँग्रेसचे माजलगाव तालुका सरचिटणीस अंकुशराव तौर यांनी दिले आहे.

060721\purusttam karva_img-20210706-wa0036_14.jpg~060721\purusttam karva_img-20210706-wa0034_14.jpg

Web Title: Inquire the quality of the asphalting bridge from Dubbathadi to Waghora