शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

बीड : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी गेल्या दोन ...

बीड : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी गेल्या दोन दिवसांत सात दुचाकी चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी रुग्णालय परिसरातील नातेवाइकांच्या दुचाकी लक्ष्य केल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही टोळ्या सक्रिय असल्याचे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांची गर्दी आहे. त्यांच्यासोबत नातेवाईकदेखील येतात. याचा फायदा हे चोरटे घेत असून, जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांसमोरून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मागील महिन्यापासून वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

जिल्हा रुग्णालय परिसरातून दोन दुचाकी लंपास झाल्याप्रकरणी शुक्रवारी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळू शंकर चव्हाण (रा. परभणी तांडा ता.वडवणी ) यांनी त्यांची दुचाकी जिल्हा रुग्णालयासमोर उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली. दुसऱ्या घटनेत प्रशांत रामभाऊ मिसाळ (रा. नवनाथनगर, बीड) यांची दुचाकी चोरट्यांनी याच परिसरातून चोरून नेली.

तिसरी घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील वायभटवाडी येथे घडली. येथील गोरख गाडे (रा. बकरवाडी ता. बीड) यांनी त्यांची दुचाकी शेताजवळ उभी करून ते कडबा काढण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. चौथ्या घटनेत भांटुंबा येथील माधव सखाराम धापाटे यांची दुचाकी (क्र. एमएच ४४ एच ८२५८) ज्ञानेश्वर चव्हाण याने दवाखान्यात जाण्याचे कारण सांगून लंपास केली. याप्रकरणी युसूफ वडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचवी घटना आष्टी शहरात घडली. येथील हॉटेल चालक सागर चंद्रकांत जाधव यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २३ एल १९५८) ही हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ती चोरट्यांने लंपास केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहावी घटना तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत घटली. मुनूबाई जवळा येथील रावसाहेब उन्हवणे (रा.गुंधा वडगाव, ता.बीड) यांची दुचाकी (क्र. एमएच २३ एल १९५८) ही २५ मे रोजी चोरट्याने चोरून नेली. सातवी घटना ही बीड तालुक्यातील आंबील वडगाव येथे घडली. येथील कपिल शाहूराव खिंडकर यांची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने टोळी ताब्यात घ्यावी

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या टोळीचा बंदोबस्त करावा व नागरिकांच्या चोरीच्या दुचाकी परत देण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.