सासरच्यांची पैशांची हाव वाढली; पुण्याच्या वैष्णवीनंतर अंबाजोगाईत शुभांगीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:40 IST2025-06-06T13:36:43+5:302025-06-06T13:40:17+5:30

पतीसह पाच जणांवर गुन्हा : सासरच्या लोकांनी तिला त्रास दिल्याने ती कायम चिंतेत असायची. यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले

In-laws' greed for money increased; After Vaishnavi of Pune, Shubhangi ended her life in Ambajogai | सासरच्यांची पैशांची हाव वाढली; पुण्याच्या वैष्णवीनंतर अंबाजोगाईत शुभांगीने संपवले जीवन

सासरच्यांची पैशांची हाव वाढली; पुण्याच्या वैष्णवीनंतर अंबाजोगाईत शुभांगीने संपवले जीवन

अंबाजोगाई : पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हे हुंडाबळीचे प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी संतोष शिंदे (वय २५, रा. गित्ता, ता. अंबाजोगाई) या विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोहखेड( तालुका धारूर) येथील शुभांगी रुस्तुम सोळंके हिचा विवाह अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील संतोष शिंदे याच्या सोबत मे २०२२मध्ये झाला. विवाहानंतर एक वर्ष शुभांगीला चांगले नांदवले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी व्यवसाय करण्यासाठी सातत्याने पैशांची मागणी केली. दोन वेळा ५ लाख रुपये दिलेही. तरी सतत पैशांची मागणी होऊ लागली. याच कारणामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. पैशांच्या मागणीवरून तिला माहेरीही नेऊन सोडले होते. समजून सांगूनही बदल होत नव्हता. पैशांचा तगादा सुरूच राहिला. याला वैतागून गुरुवारी सकाळी शुभांगी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस पंचनाम्यानंतर शुभांगीच्या पार्थिवाचे दुपारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळुंके (रा. मोहखेड) यांच्या फिर्यादीवरून शुभांगीचा पती संतोष विलास शिंदे, सासरा विलास बंकट शिंदे, सासू-सुमन विलास शिंदे, नणंद -सीमा विलास शिंदे व संदीप काचगुंडे (रा. आसरडोह) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाणे करीत आहेत.

१५ दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस
२२ मे २०२२ या दिवशी शुभांगीचा मोठ्या थाटात विवाह लावण्यात आला होता. त्याच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस १५ दिवसांपूर्वीच झाला होता; परंतु या छळामुळे शुभांगीला या दिवसाचा आनंद लुटता आला नाही. सासरच्या लोकांनी तिला त्रास दिल्याने ती कायम चिंतेत असायची. यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात आले.

Web Title: In-laws' greed for money increased; After Vaishnavi of Pune, Shubhangi ended her life in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.