शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

काळी फीत, काळा मास्क लावून आयएमएचे डॉक्टर करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

बीड : डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ १८ जून रोजी देशव्यापी पातळीवर निषेध दिन पाळण्यात येत आहे. या ...

बीड : डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ १८ जून रोजी देशव्यापी पातळीवर निषेध दिन पाळण्यात येत आहे. या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आयएमए बीडचे सदस्य डॉक्टर काळ्या फिती लावून आपले रोजचे काम करणार आहेत. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवणार असल्याची माहिती आयएमए बीडचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर यांनी दिली.

महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात रुग्णालयातील शारीरिक हिंसाचाराच्या १५ घटना घडलेल्या आहेत, म्हणजे सर्वसाधारण दर महिन्याला एक तरी डॉक्टर हा कुठल्यातरी रुग्णाच्या नातेवाइकांच्या हल्ल्याचा बळी ठरतो किंवा कमीत कमी एक रुग्णालय हे हल्ल्याचा बळी ठरते आणि तिथल्या मालमत्तेचे नुकसान होते. बीड येथील बऱ्याच सामाजिक संघटनांनी डॉक्टर व रुग्णालयांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून आयएमएच्या मागण्या रास्त असल्याची भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्याचे डॉ. पांगरीकर म्हणाले.

डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारित करावा, या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहे फक्त गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो त्वरित पारित करावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात. रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा निषेध दिन पाळण्यात येणार आहे. संयत आणि संसदीय सनदशीर मार्गाने आम्ही निषेध नोंदवणार आहोत. काळ्या फिती लावून, काळे मास्क लावून आम्ही काम करणार असल्याचे डॉ. पांगरीकर यांनी सांगितले.