मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:04+5:302021-06-24T04:23:04+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही शहरी व ग्रामीण भागात मात्र, ...

Ignore the use of masks | मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष

मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही शहरी व ग्रामीण भागात मात्र, मास्कच्या वापराकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संभाव्य धोका वाढला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात जून महिन्यातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. आजपर्यंत कोरोना संसर्गाचा १३ हजार ६९१ रुग्णांचा आकडा अंबाजोगाई शहराने व तालुक्याने ओलांडला आहे. गेल्या आठवडाभरात दररोज किमान ८ ते १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघू लागले आहेत. अशाही परिस्थितीत अंबाजोगाई तालुक्यात मास्कचा वापर दुर्लक्षित झाला आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील भाजी-विक्रेते, फळविक्रेते, व्यापारी, दुकानदार, कार्यालयातील कर्मचारी, बँकांमधील अधिकारी व कर्मचारी, पतसंस्थांमधील अधिकारी व कर्मचारी तसेच खासगी संस्थांमध्ये काम करणारे व सातत्याने सार्वजनिक संपर्कात असणारे अनेकजण मास्कच्या वापराकडे सातत्याने दुर्लक्ष करू लागले आहेत. शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या व नागरिकांची कमालीची बेफिकिरी ही भविष्यात कोरोना वाढीसाठी धोकादायक ठरू लागली आहे.

Web Title: Ignore the use of masks