चारित्र्याच्या संशयातून पतीची मारहाण;एका बुक्कीत पत्नीचे समोरचे दात पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:26 IST2019-05-14T18:18:53+5:302019-05-14T18:26:31+5:30

चारित्र्यावर संशय घेत पती -पत्नीत नेहमी वाद होत

A husband's assault on wife due to suspicion of character in Beed | चारित्र्याच्या संशयातून पतीची मारहाण;एका बुक्कीत पत्नीचे समोरचे दात पाडले

चारित्र्याच्या संशयातून पतीची मारहाण;एका बुक्कीत पत्नीचे समोरचे दात पाडले

ठळक मुद्देपतीविरोधात गुन्हा आष्टी तालुक्यातील घटना 

बीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला पतीने मारहाण केली. तोंडावर बुक्की मारल्याने पत्नीचे समोरचे दोन दात पडले. ही घटना आष्टी तालुक्यातील हातोला येथील कुतरवाडे वस्तीवर सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी पतीविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिता गहिनीनाथ कुतरवाडे (३२, रा. कुतरवाडे वस्ती, हातोला) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. पती गहनीनाथ हा तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेतो. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. यावेळी पती गहिनीनाथने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्याने तोंडावर बुक्की मारल्याने अनिताचे समोरचे दोन दात पडले. यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. याप्रकरणी अनिताच्या तक्रारीवरुन पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाण्यात गहिनीनाथ विरुध्द गुन्हा नोंद झाला.

गहिणीनाथचीही सासरच्यांविरोधात फिर्याद
अनिताने आपल्याला मारहाण झाल्याचा प्रकार माहेरी सांगितला. त्यानंतर माहेरकडचे लोक कुतरवाडे वस्तीवर आले. त्यांनी गहिणीनाथसह त्याच्या वडिलांना मारहाण केली. गहिनीनाथच्या तक्रारीवरुन विष्णू महादेव वायभसे, अंकुश महादेव वायभसे, ज्ञानदेव तात्याबा शेकडे (रा. घाटापिंप्री ता. आष्टी) यांच्यावर अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: A husband's assault on wife due to suspicion of character in Beed