शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी निधनाच्या धक्क्याने पतीनेही सोडले प्राण; धारुर येथील हृदयद्रावक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST

धारूर (जि.बीड) : येथील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका दांपत्याचे निधन झाले. उपचार घेत असलेल्या पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीचे ...

धारूर

(जि.बीड) : येथील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका दांपत्याचे निधन झाले. उपचार घेत असलेल्या पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी सकाळी या दांपत्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

धारुर शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (वय ५४) यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी दवाखान्यात चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम (वय ५८) यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. या धक्क्यात त्यांची प्राणज्योत मावळली. शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. मितभाषी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. पत्नीवर नितांत प्रेम असणाऱ्या रहिम यांना पत्नी निधनाचे दु:ख सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला यातच त्यांचे निधन झाले. शहरात प्रथमच अशी हृदयद्रावक घटना घडली असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मयत दांपत्यावर धारुर शहरातील तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.