शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. प्रामुख्याने शहरातील मंडीबाजार, गुरूवारपेठ या परिसरात मोठी वाहने व जड वाहने सातत्याने येत जात असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. वाहतुकीच्या वाढत्या कोंडीमुळे या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतो. यासाठी अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक रात्रीच्या वेळी करावी, अशी मागणी प्रसिद्ध व्यापारी सुनील जाधव यांनी केली आहे.

अवैध वृक्षतोड

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत आद्यकवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ परिसर, या परिसरात वनविभागाची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. हा परिसर वृक्षांनी चांगला बहरलेला असतांना वेळीच वनविभागाने या परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवून हा परिसर योग्य स्थितीत ठेवावा

.

शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल. तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघातील प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे. शेतमजुरांना असे विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माकप नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.

हातगाडे रस्त्यावर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने हे हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

भाजीपाल्याच्या दरात घसरण

अंबाजोगाई : ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्ये अचानकच घसरण झाली आहे. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दरही कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.