शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

माजलगाव, अंबाजोगाईच्या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:37 AM

मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १३ मिलीमीटर पाऊस झाला.

ठळक मुद्दे पहिल्या पावसाने शेतकरी सुखावला

बीड : मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १३ मिलीमीटर पाऊस झाला.

माजलगाव आणि अंबाजोगाई महसूल मंडळात ७० मि.मी. पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल ७७ मि.मी.पावसाची नोंद झाली. याशिवाय परळी महसूल मंडळात ४२ मि.मी., माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात ४० मि.मी. तर दिंद्रुड महसूल मंडळांतही ६३ मि.मी.पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. वादळी वारे आणि पावसामुळे परळी, वडवणी तालुक्यात वीज पुरवठा काही तास खंडीत झाला. केज तालुक्यातील यूसूफ वडगाव येथे फळबागेचे नुकसान झाले. पावसामुळे गेवराईच्या संजयनगर भागात एक घर कोसळले.गेवराई तालुक्यात मान्सुनपुर्व पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. नंतर पुन्हा मंगळवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मान्सून पूर्व पावसाने सोमवारी पहाटे तालुक्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा रात्री पासुन पावसाला सुरूवात झाली. शहरासह तालुक्यातील मादळमोही, उमापुर, धोंडराई, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगाव, जातेगाव, पाडळिसंगी, चकलांबासह विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा पाऊस सुरूच होता.मातीचे घर पडले; दोन मुले किरकोळ जखमीगेवराई शहरातील संजयनगर भागात मातीचे बांधकाम व पत्र्याचे शेड जास्त आहेत. वादळ वाऱ्यात त्यांना याचा अधिक त्रास होतो. मंगळवारच्या पावसात सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे घर पडले. यात घरात असलेल्या अमोल बर्डे (१५) व कुमार बर्डे (६) हे दोघे किरकोळ जखमी झाले. ही माहिती समजताच आ.लक्ष्मण पवार यांनी पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे दादासाहेब गिरी, तलाठी राजेश राठोड यांनी पंचनामा केला. यावेळी शेख शब्बीर, शेख खाजा, मुरली बर्डे, भारत बर्डे,केरबा बर्डे, सय्यद रिफक, शेख मुस्सा, राजेंद्र माळी, शेख बाबु, सय्यद अंबर आदी उपस्थित होते.वडवणीत नद्या, नाल्यांना आले पाणीवडवणी : तालुक्यात पहाटे तीन पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सर्वदुर पाऊस झाला. यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्या, नाल्यांना पाणी आले होते. पहिल्याच पावसात महावितरण कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. पावसादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गत आठवड्यात दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून मोठा गाजावाजा करत पावसाळा पूर्व वीज दुरु स्तीची कामे केली जात असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला अपयश आले आहे. यामुळे नागरिकांचे हाल झाले.दोन दिवसांच्या पावसाने अंबाजोगाई गारवाअंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात गेली दोन दिवसापासुन सतत होणाºया पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी भल्यापहाटेच सुरु झालेल्या वादळी पावसाचा तडाखा सहन न झाल्यामुळे गेली १०० वर्षापूर्वी पासून सबजेल समोर उभे असलेले वडाचे झाड मंगळवारी सकाळी आठ वाजता उन्मळुन पडले. यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.लोखंडी सावरगाव येथे सर्वाधिक ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्या, नाल्या वाहू लागल्याचे चित्र दिसून आले. पहिल्याच पावसासमोर महावितरणने गुडघे टेकले आहेत. पावसाचे अधिक प्रमाण असलेल्या भागात मध्यरात्रीनंतर बराच काळ विद्युत पुरवठा खंडित राहिला.परळी तालुक्यात संततधार पाऊसपरळी : शहर व ग्रामीण भागात मंगळवारी पहाटे विजेच्या कडकडाटसह दमदार पाऊस झाला. सेलू येथील एका शाळेवरील पत्रे उडाली. पेरणीपूर्व मशागतीसाठी पाऊस फायद्याचा ठरणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत संततधार पाऊस चालू होता. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. हवेत गारवा निर्माण झाला व उष्णता कमी झाली. परळी, सिरसाळा, गाढेपिंपळगाव, महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. परळी तालुक्यात एकूण ४४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या काही ठिकाणी पाणी साचले होते. परळी -पिंपळा धायगुडा अंबाजोगाई रस्त्याचे काम चालू असल्याने वाहन धारकांची तारांबळ उडत आहे.युसूफवडगावमध्ये केळीचे नुकसानकेज : केज शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाºयासह झालेल्या पावसाने युसूफवडगाव येथील शेतकरी सचिन रमेश मुकादम यांच्या शेतातील केळीच्या बागेतील ७०० झाडे आडवी पडली. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात इतर ठिकाणीही अनेक भागात किरकोळ नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने ते शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी आहे.

 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र