हृदयद्रावक! पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी; मुलाच्या समोरच दोघांचाही बुडून अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:54 IST2025-12-09T18:50:41+5:302025-12-09T18:54:32+5:30

वाघेबाभुळगाव शिवारात घटना, एका क्षणात पवार दाम्पत्याचा अंत

Heartbreaking! Husband jumps into well to save wife; Both drown in front of son | हृदयद्रावक! पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी; मुलाच्या समोरच दोघांचाही बुडून अंत

हृदयद्रावक! पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी; मुलाच्या समोरच दोघांचाही बुडून अंत

केज (बीड): केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव शिवारात शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी एका अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाला. विहिरीत पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीनेही विहिरीत उडी घेतली, मात्र दोघांनाही नियतीने गाठले. एका क्षणात अतूट नात्याची शोकांतिका घडल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाणी काढताना काळ आला आणि दोघांना घेऊन गेला
वाघेबाभुळगाव शेजारील पवारवाडी येथील शेतकरी भास्कर विनायक पवार, त्यांची पत्नी अल्का पवार आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही शुक्रवारी त्यांच्या शेतात खुरपणी करत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. पत्नीला बुडताना पाहून पती भास्कर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता, पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. 'मी तुझ्याशिवाय नाही' याच अविर्भावाने त्यांनी पत्नीला वाचवण्याचा जीवतोड प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावासाठी योग्य आधार न मिळाल्याने, अल्का पवार आणि भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचाही विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

मुलाच्या समोरच आई- वडिलांचा मृत्यू
ही सर्व घटना त्यांच्या मुलाच्या (ऋषिकेश) डोळ्यांदेखत घडल्याने मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title : बीड में त्रासदी: पत्नी को बचाने में पति की कुएं में डूबकर मौत

Web Summary : बीड में एक हृदयविदारक घटना में, एक किसान दंपति की मौत हो गई जब पत्नी गलती से कुएं में गिर गई। पति ने उसे बचाने के लिए छलांग लगा दी, लेकिन दोनों अपने बेटे के सामने डूब गए। घटना से गांव में मातम छा गया है।

Web Title : Tragedy in Beed: Husband dies trying to save wife from well.

Web Summary : In a heartbreaking incident in Beed, a farmer couple died after the wife accidentally fell into a well. The husband jumped in to save her, but both drowned in front of their son. The incident has cast a pall of gloom over the village.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.