वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 06:30 IST2025-01-18T06:29:36+5:302025-01-18T06:30:07+5:30
याप्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला
केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात मकर संक्रांतीच्या दिवशी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचवेळी त्याचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
धनंजय देशमुखांचा जबाब
दरम्यान, स्व संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांचा शुक्रवारी दुपारी केज न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला.
दबाव न घेता निष्पक्षपाती चौकशी करा : अजित पवार
वाल्मीक कराडप्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने कोणाच्याही दबावात येऊ नये. निष्पक्षपाती चौकशी करावी, अशा सूचना दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पवार म्हणाले की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर घरात कसा गेला, याचा तपास सुरू आहे.