व्यापाऱ्याचा दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:21 IST2019-06-26T00:20:36+5:302019-06-26T00:21:07+5:30
मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे.

व्यापाऱ्याचा दीड लाखाचा ऐवज लंपास
बीड : मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे.
मुंबई येथील व्यापारी रवी पोपटलाल गोयल हे चांदीचे दागिने घेऊन बीड येथे विक्री करतात. चांदीचे पैजण, वाळे, अंगठी असे अनेक दागिने ते बीड शहरात विक्रीसाठी घेऊन येतात. बीडहून मुंबईला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्चे तिकिट काढले होते. ते गाडीत बसण्यासाठी शहरातील शिवाजी चौक येथे रिक्षाने गेले. चौकात जाताच गोयल यांना तहान लागली होती. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी उतरले असता त्यांच्या बॅगमधून चांदीचे दागिने व रोख दीड लाखाची रक्कम चोरट्याने पळवली. पवार तपास करीत आहेत.