कन्या जन्मदर वाढीसाठी बीड पॅटर्न ठरणार ‘गाईड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:49 PM2019-09-15T23:49:54+5:302019-09-15T23:51:10+5:30

मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.

'Guide' to Beed Pattern for Increasing Girl Birth Rate | कन्या जन्मदर वाढीसाठी बीड पॅटर्न ठरणार ‘गाईड’

कन्या जन्मदर वाढीसाठी बीड पॅटर्न ठरणार ‘गाईड’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. आता हाच ‘बीड पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला जाणार आहे. यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शास्त्रीय अभ्यास करून मार्गदर्शक सुची करण्याचे निर्देश दिले आहेत.
२०११ साली बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा एक हजार मुलांमागे ८१० एवढा होता. त्यानंतर २०१२ साली आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची चौकशी तसेच नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत डॉक्टरांसह नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. तर अनेक सोनोग्रामफी सेंटरच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कायद्याचा धाक बसला आणि अवैध गर्भपात बंद झाले. याचा परिणाम जिल्ह्यात मुलींच्या जन्मदर वाढण्यास झाला. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना, मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना या योजना सर्वच यंत्रणांनी प्रभावीपणे राबविल्या. बीड राज्यात अव्वलही राहिले. त्याचबरोबर गर्भवती महिलांची तपासणी आणि मुलींबद्दल सामाजिक पातळीवर केलेली जनजागृती याचाही फायदा मोठ्या प्रमाणात झाला आहे. लोक शिक्षण, जनजागृती आणि केलेल्या कठोर कारवायांमुळे मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांची यादी करुन इतर जिल्ह्यांना पाठविली जाणार आहे.
जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार, महिला व बालकल्याण अधिकारी चंद्रशेखर केकाण यांच्या टिमसह सामाजिक संघटना यासाठी जनजागृती करून परिश्रम घेत आहेत.
जिल्हा रूग्णालयात तीन हजार मातांचा परिचारिकांकडून सन्मान
मुलींना जन्म देणा-या मातांचा जिल्हा रूग्णालयात सन्मान केला जातो. आतापर्यंत जवळपास ३ हजार मातांचा सन्मान करण्यात आलेला आहे.
यासाठी प्रसुती विभागातील डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी नेहमीच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
पहिल्यांदा बीडमधून अशा वेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाला सुरूवात झाली आहे.

Web Title: 'Guide' to Beed Pattern for Increasing Girl Birth Rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.