शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरण: दिलीप फाटेंना पोलिसांचे ‘संरक्षण’?; चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:44 IST

सुसाइड नोट असूनही पोलिसांची दिरंगाई; वर्षभराचे कॉल रेकॉर्ड तपासणार

बीड : येथील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर (३५) यांनी सहायक आयुक्त दिलीप फाटे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ‘सुसाइड नोट’ जाधवर यांच्या खिशात सापडूनही अद्याप फाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना घडून चार दिवस उलटले आहेत. पोलिसांकडून आरोपीला वेळ देऊन एकप्रकारे ‘संरक्षण’ दिले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

सचिन जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने ते गेल्या चार महिन्यांपासून तणावात होते. त्यातच सहायक आयुक्त दिलीप फाटे हे त्यांना सतत फोन करून आणि प्रत्यक्ष बोलावून मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख जाधवर यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे. तरीही बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या केवळ ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद असून गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात सचिन जाधवर यांचे नातेवाईक मयुरी जाधवर यांनाही संपर्क केला परंतु कॉल न घेतल्याने बाजू समजली नाही.

नातेवाइकांकडे बोट दाखवून पोलिसांचे हात वर‘नातेवाईकांनी अद्याप तक्रार दिली नाही,’ असे कारण पुढे करून पोलिस वेळ मारून नेत आहेत. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मृताजवळ सापडलेली चिठ्ठी हाच ‘मृत्यूपूर्व जबाब’ मानून पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करू शकतात. असे असतानाही पोलिसांची टाळाटाळ संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, पोलिस आता जाधवर आणि फाटे यांचे मागील एक वर्षाचे कॉल रेकॉर्ड तपासणार आहेत.

अविनाश धांडे आत्महत्या : नावे असूनही कारवाई शून्य!बीड नगरपालिकेचे कर्मचारी अविनाश धांडे यांनी पालिकेच्या छतावरच गळफास घेतला होता. त्यांच्या मोबाइलमध्ये डीपीओ संभाजी वाघमारे, तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे, उपमुख्याधिकारी सम्राट कदम, विश्वंभर तिडके व चंदू काळे यांच्या त्रासाचा उल्लेख होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची तक्रार नसल्याचे कारण सांगत कोणावरही कारवाई न करता हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. त्यामुळे येथेही पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

तपास सुरू आहेनातेवाईक पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. ते तक्रार देण्यासाठी येणार आहेत, असे समजले. परंतु मी शासकीय कामानिमित्त अंबाजोगाईला आलो आहे. चौघांची चौकशी झाली असून आणखी काही लोकांची करत आहोत. पंचनामाही झाला आहे. सर्व तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.- बाळराजे दराडे, सहायक पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण

English
हिंदी सारांश
Web Title : GST officer suicide: Police 'protecting' accused? No FIR even after days.

Web Summary : Despite a suicide note, police haven't filed an FIR against the accused in the GST officer's suicide case. Relatives are expected to file a complaint. Police claim an investigation is underway, including checking call records. A similar previous case remains unresolved.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय