प्रशासनाकडून आवाहन केल्यानंतरही लोक काळजी घेत नसल्याचे समोर येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील ५ हजार २ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४ हजार ७६८ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २४१ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई ५, आष्टी ४४, बीड ५०, धारुर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरुर ३९, वडवणी ९ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९६ हजार ७१२ एवढी झाली आहे. पैकी ९२ हजार ५७४ जण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत. साथरोग अधिकारी डाॅ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}