भरधाव ट्रॅव्हल आणि कारच्या अपघातात ग्रामसेवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:27 PM2021-06-16T12:27:34+5:302021-06-16T12:27:34+5:30

बीड-परळी महामार्गावर वडवणीजवळ झाला अपघात 

Gramsevak killed on the spot in speedy Travel and car accident | भरधाव ट्रॅव्हल आणि कारच्या अपघातात ग्रामसेवक जागीच ठार

भरधाव ट्रॅव्हल आणि कारच्या अपघातात ग्रामसेवक जागीच ठार

googlenewsNext

वडवणी ( बीड ) : बीड-परळी महामार्गावर वडवणीजवळ कार व ट्रॅव्हलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 41 वर्षीय ग्रामसेवक जागीच ठार झाले. राजेंद्र श्रीरंग मुंडे असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. 

तालुक्यातील मौजे देवडी येथील रहिवासी राजेंद्र श्रीरंग मुंडे हे केसापुरी ग्रामपंचायत येथे ( परभणी ) ग्रामसेवक या पदावर कार्य करत. मुंडे बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास स्वतःच्या कारने  ( एमएच 02 सिएफ 5226 ) बीडकडे जात होते. वडवणीजवळ बीडकडून येणारी खाजगी ट्रॅव्हलसोबत ( एमएच 29 व्हि 7227 ) मुंडे यांच्या कारची समोरासमोर  धडक झाली. यात ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे जागीच ठार झाले. अपघातात कारचा चुराडा झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच वडवणी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, आसेफ शेख, अशोक आघावसह अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

Web Title: Gramsevak killed on the spot in speedy Travel and car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.