पोषण आहार उशिरा द्या, पण बँकेत खाते उघडायचे सांगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:24+5:302021-07-05T04:21:24+5:30

अंबाजोगाई : उन्हाळी पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळांतील पाहिली ...

Give nutritious food late, but do not ask to open a bank account | पोषण आहार उशिरा द्या, पण बँकेत खाते उघडायचे सांगू नका

पोषण आहार उशिरा द्या, पण बँकेत खाते उघडायचे सांगू नका

अंबाजोगाई : उन्हाळी पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचे फर्मान काढले. परंतु राष्ट्रीयीकृत बँकेत प्रतिसाद मिळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. आम्हाला पोषण आहाराचे साहित्य उशिरा दिले तरी चालेल, परंतु राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडायला सांगू नका, असे पालक सांगत आहेत.

उन्हाळ्यातील पोषण आहार अद्याप वाटप झाला नाही. त्या आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे ठरले. शिक्षण विभागाचे आदेश सर्व शाळांतील मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पडले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या ग्रुपवर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्याचा खाते नंबर शाळेत देण्याची सूचना टाकली. पालक आपल्या मुलांना घेऊन राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी फिरू लागले, परंतु राष्ट्रीयीकृत बँकेत कर्मचारी टाळाटाळ करू लागले. अठरा वर्षांच्या आत खाते काढता येत नाही, असेही सांगण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या काळात राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याबाबत पाहिली ते आठवी आणि या वर्षात नववीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन सूचना दिल्या आहेत. पालक व विद्यार्थी खाते काढण्यासाठी फिरत आहेत, परंतु राष्ट्रीयीकृत बँकेतून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होऊ लागले. सर्व शाळेत दहावीच्या निकालाचे संकलित काम सुरू आहे. त्यात या नवीन आदेशाची भर पडल्याने शिक्षकांचे काम वाढले आहे.

Web Title: Give nutritious food late, but do not ask to open a bank account