शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकत घ्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

बीड : देशात हुंडाबंदी कायदा अंमलात आला. त्याला १ जुलै २०२१ रोजी ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, हुंड्याची ...

बीड : देशात हुंडाबंदी कायदा अंमलात आला. त्याला १ जुलै २०२१ रोजी ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, हुंड्याची कुप्रथा अद्यापदेखील सुरूच असून, बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलत असल्याचे चित्र आहे. पूर्वी रोख रकमेत हुंडा घेतला जात होता. मात्र, आता त्याचे स्वरूप बदले असून, सोने, प्लॉट, गाडी, बंगला आणि फ्लॅटच्या स्वरूपात हुंडा घेतला जात आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी ‘आम्हाला हुंडा नको, तुमच्या मुलीला दागिने, प्लॉट, बंगला आणि गाडी द्या’ अशा स्वरूपाची मागणी केली जाते. ही परिस्थिती अनेक मध्यमवर्गीय व उच्चशिक्षितांमध्ये असल्याचे दिसून येत. तसेच मुलाचा व्यवसाय नोकरी यावरून त्याच्या हुंड्याची किंमत ठरत असून, वर्ग १ व वर्ग २ चे सरकारी अधिकारी असलेल्या मुलांसाठी हुंड्याची जणू बोली लागलेली असते, अशी परिस्थिती काही समाजात असल्याचे आढळून येते. विवाहानंतरदेखील अनेक विवाहितांचा पैशासाठी छळ होत असून, यामध्ये सर्व स्तरावरील कुटुंबांचा समावेश आहे. या जाचास कंटाळून अनेकवेळा विवाहित महिला आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे प्रकारदेखील घडले आहेत.

मात्र, सुशिक्षित पिढी काही प्रमाणत बदलत असून, हा बदल मुलींमध्ये मोठ्या प्रमाणत दिसून येत आहे. मुलींचा हुंडा देण्यासाठी नकार असून, हुंडा न घेता स्वीकार करणाऱ्या मुलांसोबतच संसार करण्याचा त्यांना मानस आहे.

हुंडा म्हणायला की पोराचा लिलाव ?

हुंड्याच्या नावाखाली पोराचा लिलावच केला जात असल्याचे समोर आले आहे.

हुंड्याच्या नावाखाली महागड्या वस्तूंची मागणी मुलीकडच्यांकडे केले जाते.

हुंड्याच्या नावाखाली मुलीच्यांकडून मोठा पैसे उकळण्याचा प्रकार काही घरांमध्ये केला जाते.

अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...

हुंडा मागणाऱ्यांमध्ये समाजातील अशिक्षित, उच्चशिक्षित कुटुंबांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे.

बहुतांश मुलांच्या कुटुंबांना हुंडा हवा आहे. मात्र, त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. व्यवसाय नोकरीसाठी डोनेशन प्लॉट, फ्लॅट, सोने बंगला आणि गाडी भेट स्वरूपात घेतली जाते.

मुलींकडून विरोध केल्यानंतर विवाहानंतर या सर्व बाबींची मागणी केली जाते. तसेच यासाठी मुलीस त्रासदेखील दिला जाते.

मुलींचे माता-पिताही जबाबदारच...

सरकारी नोकरदार असल्याचा त्याच्यासोबत सोयरीक करण्यासाठी मुलीच्या घरच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांची असते त्यामुळे तेदेखील या परिस्थितीला जबाबदार आहेत. याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.

गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते

नवी पिढी बदलते...

उच्च शिक्षणात मुलींचा टक्का वाढला आहे. परिणामी जोडीदाराची निवड करताना त्याचे शिक्षण व स्वभाव या सर्व बाबी मुली पाहतात. त्यानंतर विवाहास पसंती देत आहेत. त्यामुळे मुलींचा हुंडा पद्धतिला कायम विरोध आहे.

भाग्यश्री वैष्णव, शिक्षक

जोडीदार शोधताना पालकांकडून उच्च शिक्षण व पॅकेजला महत्त्व दिले जात आहे. मात्र, आताच्या काळात मुलीदेखील कमवत्या असल्यामुळे त्यांना अनुरूप जोडीदार हवा असून, त्यांना समजून घेणारा पती त्यांना हवा आहे.

सचिन कोटुळे, पालक