महागाई,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईत अंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:26+5:302021-08-22T04:36:26+5:30

भाजपच्या सरकारने इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे व महिला, गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...

Gevrai agitation to protest against inflation and gas price hike | महागाई,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईत अंदोलन

महागाई,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईत अंदोलन

भाजपच्या सरकारने इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे व महिला, गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्यामुळे जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी गेवराई येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीने सरकारच्या विरोधात घोषणा देत नायब तहसीलदार रामदासी यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शाहीन पठाण, शहराध्यक्षा मुक्ता आर्दड,पल्लवी गोगुले, किरण दाभाडे, योगिता तांबारे, जयश्री दाभाडे, शीला पैठणे, सीमा जवंजाळ, विमल दाभाडे, सुनीता दाभाडे, गौरी दाभाडे, जनाबाई कांबळे, समाबाई, कांबळे, सुलताना शेख, फिरदोस फारोकी आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

210821\img-20210821-wa0204_14.jpg

Web Title: Gevrai agitation to protest against inflation and gas price hike