रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:28+5:302021-08-22T04:36:28+5:30

बीड: कोरोना काळात प्रवास करायचा असल्यास पोलीस प्रशासनाकडून ई-पास दिले जात होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ...

Get Universal E-Pass at home for mall access with train, air travel | रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास

बीड:

कोरोना काळात प्रवास करायचा असल्यास पोलीस प्रशासनाकडून ई-पास दिले जात होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या पासची आवश्यकता भासत नाही. मात्र, हवाई, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे आंतरराज्य प्रवास करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. याशिवाय निर्बंध हटविले असले तरी हॉटेल, किराणा व इतर सर्वच व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे सक्तीचे केले आहे. याशिवाय मॉलमध्ये प्रवेशाविषयीदेखील नवीन आदेश काढण्यात आला असून, मॉलमध्ये प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, फोटोसह ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे.

...

सर्व प्रक्रिया ऑनलाइन

हवाई प्रवास असो की रेल्वेद्वारे आंतरराज्य प्रवास असो किंवा माॅलमध्ये प्रवेश करायचा असेल तर यासाठी घरबसल्या ‘सिस्टीम जनरेट पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास कोणत्याही अधिकाऱ्याकडे न जाता स्वत:च ऑनलाइन माहिती भरून मोबाइलवर डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच हा पास मिळणार आहे.

...

दोन्ही डोस घेतले किती

फ्रंटलाइन वर्कर्स १८,४९८

आरोग्य कर्मचारी ११,३०१

१८ ते ४४ वयोगट ३६,६६१

४५ ते ५९ वयोगट ७६,४३८

६० पेक्षा जास्त वयाचे ७४,७८०

....

Web Title: Get Universal E-Pass at home for mall access with train, air travel