बीडमध्ये उभारणार आण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:14+5:302021-07-18T04:24:14+5:30

बीड : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे झुंझार नेते, क्रांतिसूर्य कै. आण्णासाहेब पाटील यांचा बीडमध्ये ...

A full-sized statue of Annasaheb Patil will be erected in Beed | बीडमध्ये उभारणार आण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा

बीडमध्ये उभारणार आण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा

बीड : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे झुंझार नेते, क्रांतिसूर्य कै. आण्णासाहेब पाटील यांचा बीडमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शुक्रवारी बीडमध्ये बैठक पार पडली असून, कै.अण्णासाहेब पाटील स्मारक समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते रवी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

बैठकीला अशोक हिंगे, ॲड. मंगेश पोकळे, बी. बी. जाधव, प्रा. राजेश भुसारी, भास्कर गायकवाड, डॉ. प्रमोद शिंदे, अजित वरपे, बळीराम गवते, स्वप्निल गलधर, सुनील सुरवसे, बालाजी पवार, सचिन उबाळे, गंगाधर काळकुटे, रमेश पोकळे, ॲड. महेश धांडे, भाऊसाहेब डावकर, रमेश चव्हाण, गोरख शिंदे, शैलेश जाधव, विजय लव्हाळे, किशोर गिराम, संदीप उबाळे, धनंजय शेंडगे, गोपाळ धांडे, विनोद इंगोले, अनिल माने आदींची उपस्थिती होती.

160721\022616_2_bed_15_16072021_14.jpeg

शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. यावेळी नवनियूक्त अध्यक्ष रवि शिंदे यांच्यासह इतर मान्यवर दिसत आहेत.

Web Title: A full-sized statue of Annasaheb Patil will be erected in Beed