शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

भुरळ टाकून महिलेची ५६ हजार रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

परळी : नकली सोन्याचे बिस्किट सापडल्याच्या नादात अंगावरील असली सोन्याचे दागिने देऊन महिलेने स्वत:ची फसवणूक करून घेतली. ...

परळी : नकली सोन्याचे बिस्किट सापडल्याच्या नादात अंगावरील असली सोन्याचे दागिने देऊन महिलेने स्वत:ची फसवणूक करून घेतली. दागिन्याच्या बदल्यात मिळालेले बिस्किट सोन्याचे नसून पितळाचे असल्याचे नंतर महिलेच्या निदर्शनास आले.

११ ग्रॅमचे बिस्किट हरवले होते, ते तुम्हाला सापडले होते. ते मला परत द्या किंवा तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून द्या असे म्हणून भुरळ पाडून महिलेच्या अंगावरील ५६ हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेऊन दोघा अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केली. शहरातील कावेरी लॉज मार्गावरील एका बँकेजवळ सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सोमवारी रात्री परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. या दिवशी सकाळी साडेदहा वाजता शहरातील वडसावित्री नगर भागातील सुनीता नवनाथ गीते (वय ५०) या स्वतःच्या किराणा दुकानावर पाणी पाऊच खरेदीसाठी बँकेच्या परिसरात आल्या होत्या. तेव्हा त्यांना सोन्यासारखे दिसणारे बिस्किट सापडले. तेथून गीते या घराकडे निघाल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम आले व आमचे अकरा ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट हरवले होते, ते तुम्हाला सापडले होते. ते मला परत द्या किंवा तुमच्या अंगावरील दागिने काढून द्या म्हणून दोघा व्यक्तींनी या महिलेस भुरळ पाडली. अंगावरील ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून देण्यास परावृत्त केले. भुरळ पडल्यामुळे महिलेने अंगावरील दागिने दोघा अनोळखी व्यक्तींना दिले. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार सुनीता गित्ते यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार चव्हाण हे करीत आहेत. ४२ मण्यांची एक बोरमाळ, एक सेवनपीस व कानातील झुंबर असे एकूण ५६ हजार ६६१ रुपये किमतीचे दागिने दोघा व्यक्तींनी फसवणूक करून घेतले व मोटरसायकलवर बसून पळून गेले. महिलेच्या अंगावरील दागिने पाहून त्या दोघा व्यक्तीपैकी एका व्यक्तीने रस्त्यावर नकली सोन्याचे बिस्किट टाकले होते. हे बिस्किट त्या महिलेने उचलल्याचे पाहून पुढे जाऊन दोघांनी गाठले व आमचे बिस्किट आहे म्हणून त्या महिलेस भुरळ पाडली व महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. नकली सोन्याचे बिस्किट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले आहे