माजलगाव-परभणी रोडवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:05 IST2018-11-08T15:41:49+5:302018-11-08T16:05:59+5:30
माजलगाव-परभणी रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला

माजलगाव-परभणी रोडवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
बीड - माजलगाव-परभणी रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील रहिवासी असलेले व सध्या माजलगाव येथे स्थायिक असलेले दयानंद गणेश सोळंके हे पाडव्यानिमित्त गावाकडे मोरेश्वराच्या दर्शनासाठी जाऊन येत असताना हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
गंगामसला येथील रहिवाशी दयानंद गणेश सोळंके हे जाम समर्थ येथे एका खासगी बँकेत नोकरीला होते त्यांचे राहते घर हे सध्या माजलगाव या ठिकाणी असल्याने ते दिवाळीनिमित्त माजलगावला आले होते. गुरुवारी पाडवा असल्याने ते आपल्या गावाकडील दैवत असलेले मोरेश्वराच्या दर्शनाला जाऊन परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात दयानंद सोळंके (40), त्यांची पत्नी संगीता सोळंके (36), मुलगी राजनंदनी (7) व मुलगा पृथ्वीराज (5) यांचा मृत्यू झाला. माजलगावपासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखानाची साखर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक दुचाकीवर उलटल्याने अपघात झाला.