शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गॅस लिकेजमुळे आग; सासू, सुनेसह मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : घरगुती गॅसचा पाईप लीक झाल्याने घराला लागलेल्या आगीत स्वयंपाक करीत असलेल्या सुनेसह सासू व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : घरगुती गॅसचा पाईप लीक झाल्याने घराला लागलेल्या आगीत स्वयंपाक करीत असलेल्या सुनेसह सासू व सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे, तर घरातील संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले आहे. ही घटना तालुक्यातील सोनेसांगवी येथे शनिवारी सकाळी दहा वाजता घडली आहे.

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील जयश्री अशोक कणसे या शनिवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरात गॅसवर स्वयंपाक करीत होत्या. यावेळी गॅस सिलिंडरकडून गॅसच्या शेगडीकडे आलेला गॅस पाईप अचानक लिक झाला. यामुळे अचानक गॅसच्या पाईपने पेट घेतला. यानंतर घरात आगीचा भडका झाला. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्यास आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत स्वयंपाक करीत असलेल्या जयश्री अशोक कणसे (वय ३०) या कमरेपासून खाली भाजल्या आहेत, तर त्यांच्या सासू सुक्षला विष्णू कणसे (५०) यांच्या हाताला व पायाला भाजले आहे, तर सात वर्षीय श्रद्धा अशोक कणसे ही जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुकुंद कणसे यांनी दिली आहे.

....

सुनेनेच सासू, मुलीस घराबाहेर काढले

घरात लागलेल्या आगीने घरात सर्वत्र धुराचा लोळ पसरला होता. याही परिस्थितीत जयश्री कणसे यांनी घराचा पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडून सासू व मुलीस घेऊन घराबाहेर पडल्या. यामुळे पुढील अनर्थ टळला.

.....

तरुणांनी विझविली आग

या आगीत घरातील किराणा दुकानातील मिठाचे पोते, लाह्याचे पोते यासह विक्रीसाठी ठेवलेले शेती साहित्य, कपडे, भांडी, आदी विविध वस्तू खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी घरातील गॅस सिलिंडर घराबाहेर फेकून देत त्यावर कपडा टाकून त्याची आग विझविली.

....