शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागात हरितक्रांती करणाऱ्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पाच गावांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागात हरितक्रांती करणाऱ्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पाच गावांच्या ग्रामस्थांचा होणारा विरोध झुगारून प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणावरून रविवारी फोडला. धारूर तालुक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम सतरा वर्षांपासून संथ गतीने सुरू होते. यावर्षी हे काम कसेतरी पूर्ण झाले. या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढविली नाही. २० जुलैला एमआरडीसीने पत्र देऊन पाणीसाठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळविले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले. तलावाच्या सुरक्षितेचे कारण पुढे करत पहिल्या वर्षी ८५ टक्केच पाणी ठेवता येईल, असे निरीक्षण नोंदवीत सांडवा फोडावाच लागेल, अशी भूमिका घेतली. मात्र, पाच गावांच्या ग्रामस्थांनी विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, शनिवारी रात्री पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामस्थांना अचानक पत्र देऊन रविवारी सकाळी हा सांडवा फोडण्यास सुरुवात केली.

अधिकारशाहीपुढे ग्रामस्थांची नरमाई

हा सांडवा उभा दोन मीटर, तर दहा फुट आडवा फोडण्यात येत असून, अधिकारशाहीपुढे ग्रामस्थांना हात टेकावे लागले. अधिकाऱ्यांनी भीतीने कुठलेही शासनपत्रक व नियम, निर्णय नसताना सांडवा फोडला असेल, तर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गाव आणि तलावाच्या सुरक्षेसाठी

सांडवा फोडला

आरणवाडी साठवण तलावाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. पहिले वर्ष असल्याने पाणीसाठा कमी असणे तलावाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर तलावाखालील गावांची सुरक्षा लक्षात घेता हा सांडवा फोडणे आवश्यक होते. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात येईल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांनी सांगितले.

नवीन तलावाचा सांडवा फोडणे दुर्दैवी

आरणवाडी साठवण तलावाचे काम याच वर्षी झालेले असताना व पाणीसाठा झालेला असताना फोडावा लागणे, हे दुर्दैवी आहे. सांडवा फोडण्याच्या प्रकाराला शेतकऱ्यांचा विरोध असताना तो फोडल्यामुळे चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

250721\img_20210725_104021.jpg~250721\img_20210725_115330.jpg~250721\img-20210725-wa0042.jpg

आरणवाडी साठवण तलावा वर सांवा फोडताना झालेली गर्दी~आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्या नंतर वाहणारे पाणी~सांडवा फोडण्य पुर्वी