'बहुजन चळवळीतील वादळ शमले'! परळीत धम्मानंद मुंडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 18:38 IST2019-08-12T18:33:15+5:302019-08-12T18:38:03+5:30
बहुजन चळवळीतील एक वादळ शमले अशा शोकभावना यावेळी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केल्या.

'बहुजन चळवळीतील वादळ शमले'! परळीत धम्मानंद मुंडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
परळी (बीड ) : फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांचे रविवार (दि.11) हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सोमवारी भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुजन चळवळीतील एक वादळ शमले अशा शोकभावना यावेळी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केल्या.
परळी शहरातील भिमवाडी येथील मुंडे यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी रविवारपासूनच मोठी गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजता भिमवाडी येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यात परळीसह राज्याच्या कानाकोप-यातुन आलेले लोक सहभागी झाले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी भदंत नागसेन बोधी, आ.विनायक मेटे, माजीमंञी पंडितराव दौंड, प्रा.टि.पी.मुंडे, फुलचंद कराड, पि.एस घाडगे, पप्पु कागदे आदींनी मुंडे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली. शोकसभेत चंद्रकांत चिकटे, बाबासाहेब कांबळे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, दयानंद स्वामी, अजय मुंडे, भास्कर रोडे, एन.के.सरवदे, विजय साळवे, गंगाधर रोडे, दत्ताप्पा इटके, कचरु खळगे, प्रशांत शेगावकर, अतुल दुबे, दिलीप जोशी, प्रा. रविंद्र जोशी, ज्ञानोबा कांबळे, अशोक साळवे, व्हि.बी.जाधव, प्रा.दासु वाघमारे, अशोक साळवे, श्रीकांत पाथरकर, श्रीकांत बनसोडे,अशोक ताटे, वैजनाथ सोळंके, द्वारकाताई कांबळे, विजय साळवे आदींनी शोकभावना व्यक्त केल्या.