मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:10 IST2020-01-06T01:09:44+5:302020-01-06T01:10:14+5:30

अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळालेल्या मुलावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यामुळे तणावातून पित्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला

Father takes poisonous liquids as FIR against son | मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव

मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळालेल्या मुलावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यामुळे तणावातून पित्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील खेर्डा येथे घडली.
खेर्डा येथील बाळू लिंबाजी शिंदे (२१) याचे गावालगतच्या एक अल्पवयीन १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. २७ डिसेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली. इकडे बाळू शिंदेही गायब होता. मुलीच्या वडिलांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने बाळू शिंदेविरुध्द अपहरणाची फिर्याद दिली. त्यावरुन तलवाडा ठाण्यात बाळू शिंदेवर गुन्हा नोंद झाला.
दरम्यान, पोलिसांकडून या जोडप्याची शोधाशोध सुरु असतानाच बाळू शिंदेचे वडील लिंबाजी शिंदे यांनी तणावातून विषारी द्रव प्राशन केले. कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
लिंबाजी शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती खासगीत कळाली आहे. मात्र, अद्याप वैद्यकीय अधिकारी किंवा नातेवाईकांनी याबाबत कळविलेले नाही, असे सहायक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले.

Web Title: Father takes poisonous liquids as FIR against son